डोंबिवलीत श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन सोहळा

डोंबिवली : शिवसेना महिला शहर संघटक डोंबिवली पश्चिम केतकी पोवार यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिम येथील श्रीधर म्हात्रे वाडी येथे श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व जिल्हा संघटक लता पाटील,स्थायी समिती माजी सभापती जनार्दन म्हात्रे, , नगरसेविका रेखा म्हात्रे, नगरसेविका रविना म्हात्रे, रसिका पाटील, संगीता म्हात्रे, मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे,संदेश पाटील आवर्जून उपस्थित होते. शहरातील शेकडो स्वामी भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.

डोंबिवली पश्चिमेकडील साई छाया सदन सोसायटी, भागशाळा मैदान, श्रीधर म्हात्रे वाडी, कर्वे रोड, विष्णू नगर, डोंबिवली पश्चिम येथे केलेल्या श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन सोहळ्यात स्वामीच्या प्रतिमेची पारंपरिक पद्धतीने पुरोहितांच्या मंत्रीघोषात पूजाअर्चा करण्यात आली. आरती व प्रार्थनेनंतर उपस्थितांनी स्वामींची मनोभावे दर्शन घेतले. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन सोहळ्यात जिल्हा संपर्क संघटक,कविता गावंड, स्वाती हिरवे,अस्मिता खानविलकर, लक्ष्मी पवार,राजश्री कराळे,शामल आचरेकर, आरती राजपूत,शिल्पा मोरे, सुमन महाजन,इंदिराताई भोईर, मंजूला शेट्टी, दीपाली घरत, रश्मी गव्हाणे, संगीता चव्हाण,हर्षदा जावकर, विदया भावसार,सविता अहिरे, वैशाली पेणकर,गुलाबताई म्हात्रे, अर्चना धुरी,प्राजक्ता दळवी, रुचिरा मोरे, भागीरथी माने,रोषणा पाटील, नीलिमा मांजरेकर, संतोष चव्हाण, दिनेश शिवतकर, तुषार शिंदे,वैभव राणे, भाई पाणवडीकर, निखिल हरणे,राहुल म्हात्रे, अंकित जाधव यांनीही स्वामींचे दर्शन घेतले.