( चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण )
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात घरफोडी बरोबर दोनचाकी वाहन चोरीला जाण्याच्या घटना समोर येत आहेत. सातत्याने अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरात होणाऱ्या लूट व चोरीच्या पाच घटनांमध्ये एका घटनेत घरफोडी तर इतर चार घटनेत दोनचाकी वाहने चोरी झाली आहेत. जुनी डोंबिवली येथील शैलेंद्र पाटील यांच्या घराच्या सेफ्टी दरवाजाचे लॅच तोडून व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे
दागिने चोरून पोबारा केला.
दुसऱ्या घटनेत घासबाजार, कल्याण पश्चिम मुमताज मेन्शन इमारतीतील शाफिकुद्दीन शेख यांनी रस्त्यावर पार्क केलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकी स्कुटर चोरीला गेली.
तिसऱ्या घटनेत ठाकुर्ली येथील दीपतुषार इमारतीखाली योगेश बेलाटे यांनी बिल्डींगचे खाली ७० हजार रुपये किंमतीची पलसर कंपनीची मोटारसायकल पार्क करून ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.
चौथ्या घटनेत नीरज कनोजिया यांनी ९० फुटीरोड, ठाकुर्ली येथे ७० हजार किंमतीची नॉनटॉर टी. व्ही एस कंपनीची मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरी केली.
पाचव्या घटनेत प्रेम विनोद ठक्कर यांनी ५० हजार रुपये किंमतीची टीवीएस जुपिटर १२५ मोटार सायकल भागशाळा मैदानाजवळ पार्क करून ठेवलेली होती ती अज्ञात चोरटयाने चोरी केली. या सर्व चोरीच्या घटनांचा पोलिस तपास संबंधित पोलिस अधिकारी घेत आहेत.