क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिट  प्रॉपर्टी प्रदर्शन

डोंबिवली : क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिट गेली १४ वर्षे लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करित आहे. दि.१६ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ पर्यंत १५वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे प्रत्येक घर खरेदीदाराला आपल्या पसंतीचे घर, आपल्याला हव असलेल्या ठिकाणी घेण्याची सुवर्णसंधी या प्रॉपर्टी प्रदर्शन माध्यमातून होणार आहे. या विषयाची पत्रकार परिषद नुकतीच घेण्यात आली.

यावेळी क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिटचे अध्यक्ष विकास जैन, अध्यक्ष एक्झीबिशन कमिटी दिनेश मेहता, सेक्रेटरी साकेत तिवारी, रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी व विकासक उपस्थित होते.

सदर प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणा, ठाणा, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे
बघण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे. १६ लाखापासून सुरू होणारी आणि १ करोडपर्यंत घरांची काहीही प्रदर्शनात मिळणार आहे. खरेदीदारांच्या बजेटध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एम.सी.एच. आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातुन करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिट माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.

या प्रदर्शनात ४० हून अधिक विकासक १५० हुन
अधिक प्रोजेक्ट एका छताखाली बघता येणार आहेत. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी Spot Booking Discount तर आहेच तसेच प्रत्येक तासाला एक Lucky Draw देखील काढला जाणार आहे.

या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकना शिंदे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, क.डों.म.पा. आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अन्य मान्यवर भेट देणार आहेत.