डोंबिवली : भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदु ) परब यांनी त्यांची जंबो कार्यकारणी घोषित केली. डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांच्या नावांची घोषणा केली. यावेळी उपमहापौर राहुल दामले, शशिकांत कांबळे, नाना सूर्यवंशी, वरुण पाटील, दीपेश म्हात्रे उपस्थित होते. घोषित केलेल्या कार्यकारिणीमध्ये नुकताच इतर पक्षातून भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांना संधी देण्यात आली आहे.

कार्यकारिणी घोषणे दरम्यान जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले, आम्हाला संघटना वाढवायची आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक काम करताना जे जे करावे लागते ते ते करणार. संघटना वाढीसाठी आमची संपूर्ण टीम काम करणार आहे. कार्यकारिणीमध्ये अनुभवी आणि काम करणारी माणसे आहेत. जरी काही जण इतर पक्षातून भाजपात आले असले तरी आता ते सर्वजण भाजपचेच असून सर्वजण पक्षाचे काम करण्यासाठी आघाडीवर आहेत.
-: कार्यकारिणी :-
उपाध्यक्ष : अभिमन्यु बाळाराम गायकवाड
(कल्याण), सुभाष बाबाजी म्हस्के (कल्याण), मनोज रामसकल राय (कल्याण), संजय मोरे
(कल्याण), प्रदीप शरद चौधरी (ठाकुर्ली), जितेंद्र भोईर (डोंबिवली), प्रेमनाथ म्हात्रे (कल्याण), महेश पाटील (डोंबिवली), लक्ष्मण पाटील (डोंबिवली), संजय अदक (अंबरनाथ)
सरचिटणीस : रवि सिंह ठाकूर (डोंबिवली), निखील चव्हाण (कल्याण), अभिजीत गुलाबराब करंजुले (अंबरनाथ), संदीप माळी (डोंबिवली)
सचिव : प्रकाश भोईर (डोंबिवली), विजय जोशी (कल्याण), ओमनाथ नाटेकर (डोंबिवली), मनोज घरत (डोंबिवली), अमित राजाराम कासार (डोंबिवली), परेश गुजरे (टिटवाळा) शशिधर शुक्ला
(डोंबिवली), सचिन यादवडे (कल्याण) मोहन के. नायर (डोंबिवली), प्रकाश तेलगोटे (डोंबिवली)
कोषाध्यक्ष दिनेश मेवालाल दुबे (डोंबिवली),
कार्यालय सचिव आनंद अरविंद देशपांडे
(डोंबिवली)
महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना नरेंद्र सूर्यवंशी
(कल्याण), युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम रमेश तरे (कल्याण), किसान मोर्चा अध्यक्ष शाम बाबुशेठ पाटील (श्रीमलंग गड), अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष रितेश दिपक खराटे
(कल्याण), ओ.बी.सी मोर्चा अध्यक्ष शाम मधुकर मिरुकुटे (कल्याण), आदिवासी मोर्चा अध्यक्ष बुधाराम गणपत सरनोबत (टिटवाळा), अल्पसंख्यांक मोर्चा मुजीफ मुर्तुजा जान
(कल्याण), माजी सैनिक सेल संयोजक दिनानाथ ओझा (डोंबिवली), दिव्यांग सेल संयोजक पारसनाथ हरीहरनाथ कौर (कल्याण), शिक्षक सेल संयोजक अशोक बाबुराव पगारे (डोंबिवली), पदवीधर प्रकोष्ठ सेल तानाजी प्रभाकर कर्पे (कल्याण), क्रीडा प्रकोष्ठ सेल मनोज तुकाराम शिंदे (डोंबिवली), जैन प्रकोष्ठ सेल जतिन रमनिकलाल गडा (डोंबिवली), आय. टी. सेल सेल समिर रघुनाथ दरेकर (डोंबिवली), राजस्थान प्रकोष्ठ सेल नरेश जोरसिंग राजपुरोहीत (डोंबिवली), बेटी बचाओ बेटी पढाओ सेल संयोजक दिव्या दिपक शिंदे (कल्याण), गुजरात आघाडी अध्यक्ष जतिन जगजीवन प्रजापती (कल्याण), औद्योगीक सेल देवेन सोनी (डोंबिवली), भजन मंडळ आघाडी अविनाश अनंत आंब्रे (डोंबिवली), उत्तराखंड सेल दिपक काला (डोंबिवली), मन की बात प्रमुख संजीव विजय बिडवाडकर (डोंबिवली), उडीसा सेल नृसिंह प्रसाद सयपती (डोंबिवली), रेल्वे प्रवासी आघाडी रमेश कुंडळीक गोरे (कल्याण),उत्तर भारतीय आघाडी संयोजक नागेंद्र फौजदार शर्मा (डोंबिवली), कामगार आघाडी जगन्नाथ दिपला चव्हान (कल्याण), उद्योग सेल संयोजक अरविंद सुभाषचंद्र शर्मा (डोंबिवली), व्यापारी आघाडी संयोजक अंकित रयानी महेंद्र
(डोंबिवली), भटके-विमुक्त आघाडी संयोजक कृष्णाकांत अशोक परोळेकर (डोंबिवली), वाहतुक आघाडी दत्ता यादवराव माळेकर, (डोंबिवली), ज्येष्ठ नागरीक आघाडी अनिल बाबुराव पंडीत (कल्याण), युवती आघाडी सोनी बनारसी मल (डोंबिवली), विद्यार्थी आघाडी रुषभ जयेश शहा
(कल्याण) साऊथ इंडीयन सेल संयोजक रतन जगन्नाथ पुजारी (डोंबिवली), वैद्यकीय सेल संयोजक डॉ. पंकज कैलाशनाथ उपाध्याय (कल्याण), कायदा सेल संयोजक सतिश महादेव आत्रे, (कल्याण), सहकार सेल संयोजक विनोद छत्रपती म्हात्रे (डोंबिवली), मच्छिमार सेल संयोज मोरेश्वर मोतीराम भोईर (कल्याण), सोशल मीडिया सेल संयोजक अमित देवस्थळी (डोंबिवली)
