रोज़गार मेळाव्यासाठी असंख्य इच्छुक यूवक व यूवती उपस्थित होते. स्कँनिग, पिकिंग, पँकींग या क्षेत्रातील रोजगार संधीबाबत मेळावा होता. शिक्षण अहर्ता बारावी पास असलेले इच्छुक उमेदवार मेळव्यात सहभागी झाले होते. डोंबिवलीतील तरुणांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. वरील तीन क्षेत्रातील भरीव उत्पादनाची बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे लघुउद्योगात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. आजच्या मेळाव्यात सुमारे ७६५ नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आहोत असे आयोजक परब यांनी सांगितले. भाजपा कार्यालय, नव डोंबिवली सोसायटी, डॉ. राथ पथ रोड उर्सेकर वाडी, डोंबिवली पूर्व, येथे सकाळी ९ ते ४ दरम्यान मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात पुनम पाटील यांनी तीन क्षेत्रातील रोजगारांच्या उपलब्धते विषयी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.
डोंबिवली, दि. २० (प्रतिनिधी) : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हाच्या वतीने भव्य रोजगार मेळावा आज डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांनी हा रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उदघाट्न नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात संजीव बिडवाड़कर, रवि सिंह ठाकु, पूनम पाटिल, नंदू जोशी, शशिकांत कांब़ळे, रजत राजन, संदीप माळी सर्व नगरसेवक, शहराचे-ज़िल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.