डोंबिवलीत अनोख्या प्रकारे झाली गुरुपोर्णिमा साजरी
डोंबिवली, दि. ०९ (प्रतिनिधी) : कठिण प्रसंगी मदतीचा हात देऊन समस्या निवारण करण्यास मदत करणाऱ्याचा गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून सत्कार करुन आज डोंबिवलीत अनोख्या प्रकारे गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली.
कल्याण डोंबिवली परिवहन सेवेतील अठ्ठावीस वाहक व चालकांनी त्यांच्या विविध समस्यामध्ये मदत करणारे मनसेचे परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांना गुरुस्थानी मानून त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.
यावेळी सत्काराला ऊत्तर देताना म्हात्रे म्हणाले, महानगरपालिकेकडून परिवहन सेवेला दरमहा दिड कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे परंतू ते फक्त एक कोटी पर्यंतच आणितेही अनियमित मिळते त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाहीत,अधिकारी व प्रवासी यांच्या कोंडीत सापडल्याने या परिवहन कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस दडपण वाढत आहे.त्याचा परिणाम वैयक्तिक व कौटुंबिक स्वास्थावर होतो.यामुळेच अनेक समस्या ऊद्भवतात.मी माझ्या कुवतीनुसार त्यांना मदत करुन भार हलका करण्याचा प्रयत्न करतो. पाच स्टीलची ताटे,दहा वाट्या पाच चमचे व दोन झाकण्यांसह भांडी अशी भेटवस्तू गुरुपोर्णिमेनिमीत्त प्रत्येक कर्मचाऱ्यांना देऊन भविष्यात प्रत्येक संकटात मोठ्या भावाप्रमाणे साथ देण्याचे आश्वासन प्रल्हाद म्हात्रे यांनी दिले.