दबावाच्या माध्यमातून मुजोर रिक्षा चालकांना धडा शिकवा
(“प्रोटेस्ट अगेंस्ट रिक्षावाला” व्हॉट्स ग्रुप सभेत मागणी)
डोंबिवली, दि. १० (प्रतिनिधी) : रिक्षा चालक प्रवाशांना वेठीस मनमानी करतात ही नित्याचीच बाब आहे. अशा मुजोर रिक्षा चालकांना नागरिकांनी दबाव गट तयार करून धडा शिकवायला पाहिजे अशी मागणी उपस्थित रिक्षा समस्याग्रस्त नागरिकांनी केली. वैतागलेल्या डोंबिवलीकरांनी अखेर एकत्र येऊन ‘प्रोटेकट अगेस्ट रिक्षावाला असा व्हॉट्स ग्रुप तयार केला आहे. पूर्वेकडील ठाकूर सभागृहात या विषयावर सभा घेण्यात आली त्यावेळी अनेकांनी आवळे वाईट अनुभव कथन केले.
या सभेत रिक्षाचालकांच्या विरोधात पुढील भूमिकेबाबत चर्चा झाली. यावेळी परिवहन समिती सभापती संजय पावशे, मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, विरोधीपक्ष नेते तथा स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांसह अनेक मान्यवर नागरिकांमध्ये बसून चर्चा ऐकत होते.
या सभेत डोंबिवलीत रिक्षा चालकाच्या मनमानी विरुद्ध नागरिकांनी संघटित होऊन लढा देण्याचा निर्णय घेतला असून विविध मागण्यांचे निवेदन वाहतूक पोलिसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्हॉट्सअप ग्रुप मार्फत “रिक्षा चालकाविरुद्ध प्रवासी ”असा ग्रुप स्थापन करण्यात आल्या. वंदना सोनवणे यांनी विविध प्रकारे महिला व वृद्ध नागरिकांना होनाऱ्या त्रासाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. रिक्षा चालकाविरुद्ध जर तक्रार करण्यासाठी प्रभागात अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर लावण्याची मागणी करण्यात आली तसेच जे मान्यताप्राप्त रिक्षा स्टॅन्ड आहेत. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आग्रहाची मागणी करण्यात आली. जवळचे भाडे नाकारणे, बेकाकदेशीर प्रवासी घेणे आदी प्रश्न मांडण्यात आले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नागरिक एकत्र आले होते सध्या जी व्यवस्था आहे ती खराब असून ठोक भूमिका घेऊन सर्व सामान्य नागरिकांना एकत्र होण्याचे आवाहन करण्यात आले. आजच्या सभेला मात्र अपेक्षेपेक्षा प्रतिसाद कमी होता.
परिवहन समितीचे सभापती संजय पावशे सभेला हजर होते. केवळ व्हॉट्सअप वर चर्चा करून काही होणार नाही.नागरिकांच्या सह्याचे निवेदन देण्यात येईल असे सचिन गवई यांनी सांगितले.या प्रसंगी एक फॉर्म देण्यात आला तो भरून एक समिती सथापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.मनसे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी यावेळी सभेत महापौर राजेंद्र देवळेकर आणि सर्व रिक्षा युनियनचे पदाधिकाऱ्यांना बोलावले असते तर त्यांना याची माहिती मिळाली असती अशा सूचना उपस्थितांनी मांडल्या.