नागरी सुविधा विषयावर लक्ष केंद्रित करणार — दमयंती वझे

नागरी सुविधा विषयावर लक्ष केंद्रित करणार
— दमयंती वझे
डोंबिवली, दि. १२ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिका “ई” प्रभाग क्षेत्राचा सभापतीपदाचा पदभार नगरसेविका दमयंती वझे यांनी काल घेतला. प्रभाग क्षेत्रात बारा वॉर्ड असून अनेक सोइ-सुविधा होणे गरजेच्या आहेत. असे असले तरी प्रथम स्वच्छता विषयाला देण्याची गरज आहे.  कारण संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखणे गरजेचे आहे. आता नागरी सुविधा याकडेच लक्ष केंद्रीत करणार आहे.
प्रभाग क्रमांक ११६ माणगाव सोनारपाडा च्या विद्यमान नगरसेविका यांनी सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रमेश पाटील, म्हसपौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर,शिवाजी आव्हाड, प्रकाश म्हात्रे, मुकेश पाटील, सुधीर पाटील, रमाकांत पाटील तसेच नगरसेवक-नगरसेविका यांची उपस्थिती प्रार्थनिय होती.
यावेळी त्यांनी सांगितले की, २७ गावात पाण्याचा प्रश्न खूप असून सध्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच येथील चतुर्थ श्रेणी कामगारांना फक्त दीड-दोन हजार रुपयेच मिळत आहेत तरीही ते काम करीत आहेत याला कारण म्हणजे त्यांना अपेक्षा आहे की त्यांना पुढे नियमाप्रमाणे वेतन मिळेल. त्यांच्या या विषयावर किमान वेतनासाठी महापौर आणि मुख्यमंत्री यांच्याकडे प्रश्न मांडणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या सहकार्याने येथील विकास कामावर भर देणार आहे.