डोंबिवलीतील घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ

डोंबिवली, दि. ०५ (प्रतिनिधी) : “झाडे लावा, झाडे जगवा” असे संदेश देत डोंबिवलीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थिनी वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाची प्रतीक्षा घेतली. डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचे अनोखे रक्षाबंधन केले. इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम या संस्थेचे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डोंबिवली पूर्वेकडील “चिऊ पार्क” येथे सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थिनीनी राख्या बांधल्या. यावेळी शाळेच्या शिक्षिका अनघा दामले, इनरव्हीलच्या अध्यक्षा कल्पना देशमुख, सचिव श्रुती पारसनीस, प्रकल्प प्रमुख गीता कुलकर्णी, पर्यावरण द्क्षता मंचच्या रुपाली शाईवाले, राजींव मोहिते आणि राजश्री मोहिते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतीक्षा घेतली. डॉ. देशपांडे यांनी ही प्रतीज्ञा लिहिली होती. यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा कल्पना देशमुख  म्हणाल्या, वृक्षांनीच आता मानवांचे रक्षण करण्याची वेळ आली आहे. झाडांची निगा राखण्याची गरज असल्याचे शिक्षिका अनघा दामले यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमच्या वतीने या शाळेत विद्यार्थ्यांना `निसर्ग व मी` या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.