डोंबिवली, दि. ८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सत्ता उपभोगण्यासाठी आजवर सर्वच राजकीय पक्षांनी कोळी समाज बांधवांचा वापर करून घेतला व प्रत्यक्षात सरकार दरबारी मात्र आश्वासन पलीकडे काहीच मिळाले नाही याची खंत व्यक्त करीत समाज बांधवानो एकसंघ होवून आपल्या संघटनेची ताकद वाढवा असे आवाहन कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी केले व कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी माझी आपण सर्वानुमते पुनश्च निवड केली त्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले
कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेली कोळी महासंघाची विशेष कार्यकारणी शिखर बैठक मुंबई सिडको येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी महासंघाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह हजारो समाज बांधवांनी रमेश पाटील यांची महासंघाच्या अध्यक्षपदी पुनश्च सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत महासंघाची महाराष्ट्राची प्रदेश कार्यकारणी, विभागीय तसेच जिल्हास्तरीय कार्यकारणीचे पुनर्गठन करण्यात आली. यात कार्यध्यक्षपदी प्रकाश बोबडी, जेष्ठ उपनेते रामकृष्ण केणे, देवानंद भोईर, जेष्ठ उपाध्यक्ष गजेंद्र भांजी, युवा अध्यक्ष अद्व्होकेट चेतन पाटील यांची तर महिला प्रदेश अध्यक्षापदी सुमनताई कोळी तसेच उपाध्यक्षपदी नागनाथ घिसेवाड व शिवशंकर फुले सहसचिवपदी सतीश धडे या मान्यवरांची निवड करण्यात आली. महारष्ट्रातून आलेल्या असंख्य आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अध्यक्षांनी आम्हाला समाजहित जोपासण्याची दिशा द्यावी त्या मार्गाने आम्ही संघटीत कार्य करू असे आश्वासन दिले. प्रदेश युवा अध्यक्ष चेतन पाटील यांनी समाजाच्या समस्या संदर्भात आजवर मंत्रायालयात केलेल्या पाठपुराव्याचा उहापोह करीत ६ जुलै च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत महासंघाची काय भूमिका आहे व त्यावर काय नियोजन आहे याबाबत पाटील यांनी सविस्तर विवेचन केले. पाटील यांच्या सविस्तर विवेचना नंतर उपस्थित समाज बांधवांचा सुप्रीम कोर्टाच्या निकाला बाबतचा मनातील संभ्रम दूर झाला. यावेळी कार्यध्यक्ष प्रकाश बोबडी व उपनेते रामकृष्ण केणे यांनी उपस्थितांना मार्गदेर्शन केले व नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. बैठकीच्या सरते शेवटी अध्यक्ष रमेश पाटील यांनी मार्गेदेर्शन करीत आगामी काळात समाजाला न्याय मिळविण्यासाठी महासंघाचे हात बळकट करा व एकनिष्ठ रहा असे आवाहन केले. या बैठकीचे प्रास्तविक राजहंस टपके यांनी तर सतीश धड यांनी आभार मानले.