हुक्का पार्लरवर धाड
डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : खंबाळपाडा परिसरातीत मंजुनाथ कॉलेजच्या जवळच असलेल्या गणराज हाईट्स या उच्चभ्रु लोकवस्ती इमारतीच्या तळ मजल्यावरील हुक्का पार्लरवर टिळकनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी अचानक धाड टाकून बंद केला. 17 व 18 क्रमांकाच्या या दोन्ही गाळ्यांत अवैधरित्या हुक्का पार्लर चालत असल्याची खबर वपोनि शिवाजीराव धुमाळ यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या पार्लरचा चालक हरिश भगत (30) याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर 5 हजार रूपये दंडाची वसूली करण्यात येणार असल्याचे वपोनि धुमाळ यांनी सांगितले.
दोन विविध घटनामध्ये मोबाईलस. दागिने लंपास
डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : धूम स्टाइल चोरट्यांनी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण परिसरात अक्षरशः धूमाकुळ घातला आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी नागरिकांना विशेषतः वृद्ध इसम आणि महिला वर्गाला हे चोरटे लक्ष करत असून क्षणार्धात त्यांचे मोबाईल, दागिने हिसकावून पळ काढत आहेत. कल्याण पुर्वेकडील विठ्ठलवाडी परिसरात महालक्ष्मी शॉपिंग सेंटर शेजारील साई टॉवर मध्ये राहणारे मनोज कुमार कदम काल रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल वाडी परिसरातील जकात नाक्या शेजारून जात असताना अज्ञात दुचाकी स्वर भरधाव वेगाने आले त्यामधील पाठीमागे बसलेल्या तरुणाने कदम यांच्या हातातील मोबाईल हिकसावून क्षणार्धात धूम ठोकली. या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर कोळसेवाडी पोलीस स्थानक असून ही चोरट्यांनी या परिसरात एकच धुमाकूळ घालत पोलिसांना जणू आव्हान दिले आहे. तर दुसरी घटना कल्याण पूर्वेकडील लोकधारा परिसरात घडली आहे. या परिसरात हिमालया इमारती मध्य राहणारी 56 वर्षीय महिला काल रात्रीच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसह याच परिसरातील दूध डेयरी मध्ये गेल्या होत्या. यावेळी भरधाव वेगाने एक दुचाकी त्यांच्या शेजारून गेली मात्र थोडे पुढे जाऊन ही दुचाकी पुन्हा त्यांच्या दिशेने आली या दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या हळ्यातील 43 हजार रुपये किमतीचे दागिने घेवून पसार झाले. या दोन्ही घटनांची कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.